कोदे ग्रामपंचायतीचा ५००० झाडांचा वृक्षारोपण उपक्रम..
आज शुभारंभ…
कोदे खुर्द/गगनबावडा
प्रतिनिधी – शिवाजी पाटील (7447821081)
कोदे बुद्रुक/कोदे खुर्द ग्रामपंचायतीच्या संकल्पेतून ५००० झाडांच्या वृक्षारोपणाचा शुभारंभ आज दि. १ सप्टेंबर रोजी करण्यात आला.
हे वृक्षारोपण कोदे खुर्द गावच्या शिवेपासून ते कोदे तलाव परिसरापर्यंत करण्यात येणार आहे.
यावेळी मा.विलास पाटील साहेब म्हणाले की, ग्रामपंचायत, दोन गाव आणि चार वाडीतील ग्रामस्थांच्या माध्यमातून ही संकल्पना राबवण्यात येत आहे तरी दोन्ही गावातील ग्रामस्थ आणि तरुण मंडळानी मोठ्या संख्येनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला आहे.हा उपक्रम एवढ्यावरच न थांबवता इथून पुढे दरवर्षी ५००० झाडांच्या वृक्षारोपणाची संकल्पना राबवून दोन्ही गावामध्ये तब्बल २०००० झाडांचे वृक्षारोपण करुन त्यांचे जतन करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी कोदे खोरीचे आधारस्तंभ मा.विलास पाटील साहेब, ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ.शोभा विलास पाटील ,ग्रामसेवक बाजीराव देसाई, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सर्व तरुण मंडळे उपस्थित होते.
Discussion about this post