मिरजेतील छत्रपतीं शिवाजी महाराजांची १९०० किलो वजनाची शिल्पाकृती ५२ वर्षानंतर आजही भक्कम स्थिती मध्ये
मिरजेतील ‘शिवतीर्थ’ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा तब्बल १९०० किलो वजनाचा ब्राँझ धातू पासून बनवलेला अश्वारूढ पुतळा आजही ऊन वारा पावसाळा झेलत उभा आहे. तत्कालीन येथील शिवभक्तांच्या लोकवर्गणीतून उभा राहिलेला पुतळा आजही अत्यंत चांगल्या स्थिती मध्ये उभा आहे.
काही दिवसांपूर्वी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शिवभक्तांमध्ये एकच संतापाची लाट पसरली पण यानिमित्ताने मिरज मधील शिवतीर्थावर उभा असलेला हा पुतळा म्हणजे त्याकाळातील शिल्पकारांच्या शिल्पकलेचे प्रतीक म्हणावे लागेल. १५ मे १९७२ मध्ये उदघाटन झालेल्या या पुतळ्याचे लोकार्पण झाले. लोकवर्गणीतून जमलेल्या आणि सांगलीतील दानशूर व्यक्तिमत्व भाई ताराचंद शहा यांच्या सह मिरज मधील नारायण भोंगळे, विश्वनाथ भिसे, विठ्ठलराव माळवदे,
वसंत गवंडी, दत्तात्रय रानभरे, यांच्यासारख्या अनेक शिवभक्तांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नातून जमा झालेल्या एकोणसाठ हजार रुपये वर्गणीतून शिल्पकार दादा ओतारी यांनी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या देखरेखीखाली हा १९०० किलोचा ब्राँझ धातूने बनवलेला पुतळा उभा केला. आजही हा अश्वारूढ पुतळा अभेद्य आहे. मात्र नुकत्याच घडलेल्या मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत अशी दुर्दैवी घटना घडायला नको होती.
Discussion about this post