निर्भय महाराष्ट्र पार्टी ची शनिवारी 31 ऑगस्ट रोजी शासकीय विश्राम गृह दिंडोरी येथे बैठक पार पडली या बैठकीस पक्षप्रमुख जितेंद्र भावे हे स्वतः उपस्थित होते..
यावेळी पक्ष संघटन बांधणीच्या दृष्टीने, तसेच विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने सखोल चर्चा झाली,
यावेळी पक्षप्रमुख जितेंद्र भावे यांच्या हस्ते नवीन पक्षप्रवेश झाले तसेच विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांशी चर्चा केली..
जिल्हा प्रमुख राजेंद्र गायधनी यांनी सर्वांचे मत जाणून घेऊन दिंडोरी, पिंपळगाव येथील कार्यकारणी जाहीर केली..
यावेळेस मा.चंदर गायकवाड जोरणपाडा यांची विधानसभा निवडणुकी साठी नाव सुचवण्यात आले आहे दिंडोरी तालुक्यातील जनता हि निर्भय महाराष्ट्र पार्टीला पुर्ण पणे साथ देतील
यावेळेस मा.नितिन रेवघडे राज्य सचिव निर्भय महाराष्ट्र पार्टी शेतकरी जिल्हा अध्यक्ष सुनिल धात्रक , जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित, जिल्हा सचिव रघुनाथ चौधरी, कार्याध्यक्ष कैलास बेडकोळी.तालुका अध्यक्ष डिगबंर गायकवाड उपाध्यक्ष पांडूरंग गावंडे, पिंपळगाव बसवंत शहर प्रमुख विजू भाऊ सोनवणे मुकेश भाऊ श्रीकांत घोगे , रियाज शेख, महिला तालुका अध्यक्ष पुष्पाताई रहिरे, उपाध्यक्ष अलका बोंबले,आशा कुमावत,अफसाना दाते ज्योती रहिरे,इत्यादी पद अधिकारी मोठे प्रमाणात
उपस्थित होते…
सर्वांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करणार असल्याची ग्वाही दिली…
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली…
Discussion about this post