

त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी कुमार आचारी
महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या अनाथ बालकाश्रम,त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तुपादेवी येथील मुलांना होळीच्या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या व नातवाचा वाढदिवस सुद्धा अनाथ मुलांच्या आश्रमात साजरा केला, वाढदिवस तर खूप मोठ्या पद्धतीने साजरे केले जातात पण इगतपुरी पंचायत समितीचे माजी. सभापती श्री. गोपाळ लहागे यांनी समाजापुढे एक नवीनच संदेश घेऊन आपला नातू शिव याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अनाथ बालकांना जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप करून तसेच होळीच्या सणानिमित्त गोड मिठाई तसेच चॉकलेट वाटून वाढदिवस साजरा केला या अनाथ बालकांना मायेच्या आधाराची गरज आहे त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद सदैव राहू द्या म्हणूनच आपल्या नातवाचा वाढदिवस त्यांनी अनाथ बालकांच्या आश्रमामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला,यावेळी लहांगे कुटुंब उपस्थित होते.
Discussion about this post