
लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडणार
सेलू ता.2
तालुक्यातील लोअर -दुधना सिंचन प्रकल्पातून सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास प्रकल्पाचे काही दरवाजे उघडून दुधना नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.
या प्रकल्पात 424.99 मीटर पाणीसाठा साठवल्या जातो. सद्यस्थितीत 274.203. दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी 171. 603 दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा आहे. प्रकल्पात 70.85% एवढा पाणीसाठा सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत उपलब्ध झाला. त्यामुळे जालना पाटबंधारे विभागाने या प्रकल्पातून दुधना नदीच्या पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला, दुधना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे, या जलाशयात पाण्याची आवक वाढत आहे, या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता काही दरवाजे उघडून 658 क्लासेस पाणी दुधना नदीच्या पात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता एसबी कोरके यांनी दिली. परभणी जिल्हा महसूल प्रशासनाने दूधना नदीच्या काठावरील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस सुरु आहे, त्यामुळे प्रकल्पात मोठ्या
प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. हवामान अंदाज, प्रकल्पातील सद्यस्थितीत उपलब्ध जलसाठा व प्रकल्पात होणारी आवक या सर्व बाबी लक्षात घेता, सुधारित द्वार परिचालन आराखड्यानुसार धरणाच्या सांडव्याद्वारे कोणत्याही क्षणी नदीपात्रात विसर्ग सोडण्याची कार्यवाही करावी लागेल, त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढून पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या खालील बाजूस नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याबाबत तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, वाहने किंवा जनावरे पाळीव प्राणी, अशी कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही, याबाबत उक्त गावांना तात्काळ सावधानतेचा इशारा देण्याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती. करिता माहितीस्तव व कार्यवाहीस्तव सविनय सादर.
(सु. भि. कोरके) कार्यकारी अभियंता जालना पाटबंधारे विभाग जालना, जि. जालना
Discussion about this post