
प्रतिनिधी. प्रदिप मेस्त्री
देवा ग्रुप फाउंडेशन व अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप कार्यक्रम संपन्न.
शनिवार दि. ३१ / ०८ / २०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत माळीपाडा ( मोहीलि ) , ता. शहापूर , जि. ठाणे येथे देवा ग्रुप फाउंडेशन भारत कमिटी चे अध्यक्ष श्री. सुजित ( पप्याभाई ) ढोले व देवा ग्रुप फॉउंडेशन भारत कमिटी चे सचिव श्री. डॉ.तानाजी ( भाऊ ) मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा सचिव श्री. प्रमोद ( भाऊ ) निमसे यांच्या संकल्पनेतून ” गाव तिथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ” या उपक्रमअंतर्गत तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
या आरोग्य तपासणी शिबिरात एकूण ८८ लोकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली व देवा ग्रुप फाउंडेशन च्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या, या वेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. श्री. परेश रणदिवे ( प्रमुख सल्लागार देवा ग्रुप फाउंडेशन भारत ) यांची उपस्थिती लाभली आयोजक सौ . लक्ष्मी माधव माळी ( सदस्य – ग्राम पंचायत मोहिलि ) यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले व देवा ग्रुप चे विशेष आभार मानले.
विशेष सहकार्य – डॉ. मनाली प्रताप दळवी ( धन्वंतरी क्लिनिक ) यांचे विशेष सहकार्य लाभले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव माळी , सुमित दोडे ( उपाध्यक्ष आरोग्य विभाग शहापूर तालुका ) , भगवान माळी , अनंता माळी व देवा ग्रुप फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
Discussion about this post