काँगेसचे चिमूर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात धरणे आंदोलन आज
:- समीर बल्की तालुका प्रतिनिधी चिमूर : चिमूर नगर परिषदेच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभाराविरोधात शुक्रवारी, दुपारी १२ वाजता चिमूर तहसील कार्यालयासमोर, काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ. सतीश
वारजूकर करणार आहेत. चिमूर शहरासह वडाळा (पैकु), पिंपळनेरी, सोनेगांव (बेगडे), सोनेगांव (सिरास), खरकाडा, काग, बाम्हणी, शेडेगांव, केसलापूर, कवडशी या गावांचा नगर परिषदेत समावेश करून ३० मे २०१५ ला चिमूर नगर परिषदेची स्थापना करण्यात
आली. मागील २०२० पासून नगर परिषदेचा कारभार मुख्याधिकारी प्रशासक म्हणून चालवित असीन त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post