गावापासून धरणाकडे जाणाऱ्या शेतरस्त्याची दुर्दशा
खळेगाव शेतरस्त्याची विदारक परिस्थिती
ता. प्रतिनिधी – देविदास वायाळ खळेगाव येथील शेतरस्त्याची झाली दुर्दशा. गावापासून ते धरणाकडे जाणारा रस्ता हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण हा रस्ता धरणाजवळून समोर देऊळगाव कोळ गावाकडे जातो. पण सद्यस्थितीत हा रस्ता चालण्यायोग्य नाही आहे, कारण रस्त्याने पूर्णतः चिखल बनला आहे.
नदीवरील पूल व रस्त्याची समस्या
शेतरस्त्यावर मध्ये एक आडवी नदी आहे, पण त्या नदीवर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांना आणि इतर प्रवाशांना खूप त्रास होतो आहे. पैदल चालणारे, बैलगाड्या किंवा गुरं-ढोर घेऊन जातांना लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. मातीच्या रस्त्यामुळे खुपशी चिखल होत असल्यामुळे वाहतूक अधिकच कठीण होत आहे.
दैनंदिन जीवनातील अडचणी
सदर रस्ता रोजच्या वापरासाठी 50 ते 60 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. परंतु शेतकरी महिलांना आणि मजुरांना सरळ रस्त्याने चालताही येत नाही. शेतातील माल आणि इतर आवश्यक वस्तू वाहून नेण्यासही खूप अडचण येत आहे. परिणामी, शेतातले उत्पन्न वाया जाण्याची शक्यता निर्माण होत आहे.
शासनाने लक्ष देण्याची गरज
शेतकरी बांधवांची ही समस्या त्वरित सोडवण्यासाठी शासनाने लक्ष देऊन नदीवरील पूल बांधणे आणि पक्क्या डांबर रस्त्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांचा प्रवास सुरक्षा व सोयीस्कर होऊ शकेल. या समस्येची त्वरित दखल घेऊन संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी शेतकरी बांधवांच्या अडचणींवर त्वरित कार्यवाही करावी, हे अत्यावश्यक आहे.
Discussion about this post