अमरावती प्रतिनिधी
मुंबई मधे अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ द्वारा आयोजित सलग 4 दिवस चाललेल्या 14 व्या सांस्कृतिक राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत विविध राज्यातून जवळपास 550 विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यात अमरावतीच्या राहुल डान्स अँकेडमीच्या आर डी.ए डान्स गृपच्या विद्यार्थ्यांनी एकुण 8 पारितोषिके मिळवली. त्यात वीर खांडेकर प्रथम, मानस अनासाने द्वितिय, रुपम घोरई तृतिय तर मुलींमधून ज्युनिअर गटात हृदया चांडक तृतिय, लहान गट मुलींमधे अनादी बायस व समृध्दी तेलमोरे तृतिय, ड्युएट डान्स गटात धन्वी गंगन व रिया पाटणे द्वितिय स्थानी आलेत. प्रथमच एकाच वेळी तब्बल 8 पारितोषिके मिळविल्याबद्दल विद्यार्थ्यांवर कौतुकांचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,
तसेच या डान्स अँकेडमीचे संचालक श्री.राहुल गणेशदास पारोळकर यांना मुंबई येथे नृत्य अविष्कार अवॉर्ड 2024 ने उत्कृष्ठ नृत्य दिग्दर्शक म्हणुन सन्मानित करण्यात आले.
एकाच वेळी मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांमधे आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय राहुल डान्स अँकेडमीचे राहुल पारोळकर सर व आपले माता पिता यांना देत आहेत..

Discussion about this post