भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम..कांदिवली पश्चिम मध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे कांदिवली पश्चिम येथील ज्ञानोबा तुकाराम वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ (वासकर फड) यांनी पत्रकाद्वारे आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना कळविले आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षी ही कांदिवली पश्चिम येथील वांझा वाडी,मथुरादास रोड, चव्हाण हायस्कूल जवळ, कांदिवली पश्चिम या ठिकाणी दिनांक १४ मार्च २०२५ ते दिनांक १६ मार्च २०२५ पर्यंत गुरुवर्य वै.ह.भ.प.आप्पासाहेब वासकर महाराज प्रणीत गुरुवर्य वै.ह.भप.विवेकानंद आप्पासाहेब वासकर (दादा) महाराज यांच्या
कृपा आशिर्वादाने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव गुरुवर्य हे.भ.प.कौस्तुक विवेकानंद महाराज ( राऊ मालक) , गुरुवर्य हे.भ.प.देवव्रत विवेकानंद वासकर ( राणू मालक) वासकर फड यांच्या नेतृत्वाखाली जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,
संत ज्ञानेश्वर महाराज,संत नामदेव महाराज ,संत एकनाथ महाराज, संत निळोबाराय यांनी निवेदन करुन ठेवलेल्या परंपरेनुसार बीजोत्सव निमित्त मंचरी पारायण, प्रवचन, कीर्तन,हरिजागर इत्यादी कार्यक्रम होणार आहेत,
दैनंदिन कार्यक्रमासह दिनांक १४ मार्च २०२५ ते १६ मार्च २०२५ पर्यंत दररोज पहाटे ४ते ६ काकड आरती,७ते १२ आणि दुपारी २ ते ४ पर्यंत मंचरी पारायण व दुपारी ४ते ५ हरिपाठ, आणि दिनांक १६ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते १२ बीजे निमित्त ह.भ.प.यशवंतबुवा मधुकर पाटील ( ठाणे) यांचे काल्याचे कीर्तन असे कार्यक्रम होतील,तर बीजोत्सव निमित्त ११ वाजता महाप्रसादाचा
कार्यक्रम होणार आहे, कीर्तनास साथ गायक ह.भप.संदिप सकपाळ,मृदुंगमणी हे.भ.प.दिलीप कुचेकर,हे.भ.प.रविंद्र तावडे,हे.भ.प.नंदकुमार वरळीकर,हे.भ.प.निवृत्ती तावडे यांचा सहभाग असणार आहे,तरी कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post