⏩बैलपोळा निमित्त पार्डी व उतखेड येथे चित्ताकर्षक बैलजोड्यांचे आकर्षण
⏩ कदम यांच्याकडून उत्कृष्ट जोड्यांना रोख बक्षीस व पारितोषिके वितरित
प्रतिनीधी/अमरावती
देशाच्या कृषिप्रधान संस्कृतीत शेतकरी मित्र सर्जा राजाच्या श्रमाला अनन्य महत्व आहे त्याचा सहकार्यप्रती कृतज्ञनता व्यक्त करण्यासाठी सम्पूर्ण महाराष्ट्रात बैल पोळा हा सण मोट्या उत्साहात साजरा करण्यात येतो या पारंपरिक सनाचा उत्साह वाढविण्यासाठी यंदा बैलपोळ्याच्या दिवशी बडनेरा विधानसभा क्षेत्रातील पार्डी व उतखेड गावामध्ये बैलपोळा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री.नितीन कदम यांच्या संकल्पनेतून बडनेरा विधानसभा क्षेत्रातील पार्डी व उतखेड येथे सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असतांना गावामध्ये आकर्षण सजावट असणाऱ्या तीन बैलजोड्याचे परीक्षण करण्यात येऊन त्याठिकाणी विजेत्याना रोख बक्षीस व पारितोषिके वितरित करण्यात आले.
नितीन कदम यांनी आपल्या मनोगताव्दारे, हा दिवस शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस देखील आहे. बैलांची पूजा करून त्यांच्या पाठीशी असलेल्या शेतकऱ्यांचेही कौतुक केले जाते.बैलपोळा हा सण फक्त एका दिवसाचा उत्सव नसून तो आपल्या शेती परंपरा, निसर्गाशी असलेला संबंध आणि ग्रामीण जीवनशैली यांचं जतन करतो. बैलपोळा हा उत्सव शेकडो वर्षांपासून साजरा केला जातो. यामुळे तो ग्रामीण परंपरांचं जतन करण्याचं काम करतो.
नवीन पिढीला आपल्या शेती आणि जमीन यांचं महत्व कळवण्यासाठी हा सण महत्वाचा ठरतो. असे म्हणाले. यामध्ये संघशिल बेर्डे यांच्या बैलजोडीने संकल्प शेतकरी संघटना आयोजित पार्डी येथील ‘सर्जाराजा सजावट स्पर्धेत’ अव्वल स्थान पटकावत ५१००/- रुपये रोख, गोपाल वगारे यांच्या जोडीने ३१००/- रोख, देविदास कोंडे यांच्या जोडीने २१००/- रोख त्याचप्रमाणे उतखेड येथील रमेश रंगारी यांच्या बैलजोडीने ५१००/- रोख, विष्णू कोरडे यांच्या जोडीने ३१००/- रोख, क्रिश ठाकरे यांच्या जोडीने २१००/- रोख जिंकत यांना कदम यांनी पारितोषिक वितरित केले.
यावेळी सदर गावामध्ये एकच हर्शौल्हासाचे वातावरण बघायला मिळाले.दरम्यान यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या समवेत राजू पिसे,निलेश मोगरे,नामदेवराव बारी काका,भेंडे काका,पांडुरंग कुरडकर,दिलीप पाटील,प्रकाश भोयर,अक्षय कडव,अमोल केतकर,अतुल महल्ले,देवेंद्र ढेंबरे,दिवाकर राऊत गणेश पिसे,क्रिशना मेश्राम
रवी ठाकरे,साहेबराव हटवार,सुनील राऊत,राजेंद्र ठाकरे,सुनील नगरगडे,उमेश येवले,युराज कडव,देवेंद्र बारी,सचिन दीपटे,इक्बाल शहा,विलास भस्मे,शिवा खरबडे,जीवन ठाकरे,पद्माकर राऊत,दिनेश भस्मे,वसंत भस्मे,सुबाष पिसे,आशिष गोडे,प्रविण पिंगळे ,संगम ठाकरे,तुषार पिसे,विककी वानखडे,बाबू गावनेर,नितीन ठाकरे,अभिषेक सवई,स्वप्नील माळधुरे,प्रणव सहारे त्याचप्रमाणे संघटनेचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Discussion about this post