उदगीर /कमलाकर मुळे: छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिसन मांजरे होते. तर विचार मंचावर कार्यालयीन अधीक्षक श्री व्हि.डि.गुरनाळे,यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डाॅ.रामकिशन मांजरे यांनी आपल्या मनोगतातून यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की यशवंतराव चव्हाण हे एक उत्तम साहित्यिक रसिक, विचारवंत, लेखक, राजनैतिक म्हणून सुपरीचीत होते .काँग्रेस पक्षांच्या माध्यमातून त्यांनी आपली समाजवादी विचारधारा लोकांमध्ये रुजवली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशांचे संरक्षण मंत्री ,अर्थमंत्री ,गृहमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री तसेच भारताचे उपपंतप्रधान म्हणूनही कार्य केले. त्यांना साहित्याची आवड होती. कृष्णाकाठ नावाची आत्मचरित्र लिहून आपले जीवन सार्वजनिक करण्याचा प्रयत्न केला. सह्याद्रीचे वारे ऋणानुबंध अशी पुस्तके त्यांनी लिहिली. मराठी भाषा साहित्य चळवळी या गोष्टींना त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. अशी प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. सुरेश शिंदे यांनी केले ,तर आभार डॉ. ज्ञानोबा मुळे यांनी मानले. या कार्यक्रमाला प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post