उदगीर/ कमलाकर मुळे: पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर व वर्ल्ड वाईड वेटर सर्विसेस युके यांच्या संयुक्त विद्यमाने स्वान निर्भीजीकरण कार्यक्रम या विषयावर दिनांक 28 फेब्रुवारी ते 10 मार्च 2025 दरम्यान प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण 16 पशुवैद्यकीय पदत्तर विद्यार्थी नी सहभाग नोंदविला होता. दिनांक 10 मार्च 2025 रोजी सदर प्रशिक्षणाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड प्रमुख पाहुणे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ.नितीन मार्कंडेय उदगीर नगर परिषदेचे स्वच्छता विभाग प्रमुख विशाल आल्टे तसेच वर्ल्ड वाईड व्हेटर्नरी सर्विसेस चे संचालक डॉ. शशिकांत जाधव, डॉ. वैभव वाघ आणि डॉ.शिवप्रसाद प्रशिक्षण समन्वयक डॉ. अनिल पाटील ,डॉ. रविराज सूर्यवंशी, उदगीर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक उमाकांत गंडरे मंचावर उपस्थित होते .
डॉ. गायकवाड यांनी याप्रसंगी स्वानाचे निर्भीजीकरण करून स्वान संख्या कशी कमी करता येईल, याचे महत्त्व सांगितले तसेच अति उच्च दर्जाचे पशुवैद्यक शास्त्रातील संशोधनाचा समाजसेवेसाठी कसा उपयोग करता येईल, डॉ.मार्कंडेय यांनी उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालय नेहमीच समाजसेवेसाठी कार्यरत असते व तसेच पुढील उज्वल भविष्या करता पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या विशेष अभियानाबाबत डॉ.शशिकांत यांनी उपस्थितांना माहिती दिली. स्वान निर्भिजेकरण कार्यक्रमामुळे फायद्याचे महत्त्व उदगीर नगर परिषदेचे स्वच्छता विभाग प्रमुख यांनी मत मांडले, समारोप प्रस्तावना प्रशिक्षण समन्वयक डॉ.अनिल पाटील यांनी केली. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी पदउत्तर विद्यार्थी व अंतिम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदत्तर विभाग विद्यार्थी डॉ.विभा मोवडे व आभार प्रदर्शन डॉ. सुदर्शन पटूले यांनी केले.
Discussion about this post