प्रतिनिधी:- श्रीकांत कोताडे
श्रीरामपूर तालुक्यातील श्री क्षेत्र सराला बेट येथे २२ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता ब्रह्मलीन संत नारायणगिरीजी महाराज यांच्या १६ व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
🔹 महंत रामगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाने कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे.
🔹 संत नारायणगिरीजी महाराज यांचा त्याग व धर्मपरायणता अद्वितीय होती. त्यांनी कधी कोणापुढे लोटांगण घातले नाही, उलट राजकीय नेते त्यांच्या जवळ आले तर ते अधिक कठोर राहिले.
🔹 “आम्ही अखंड सप्ताहात लाह्या वाटून करू, कोणावर विसंबून राहणार नाही” असे त्यांचे विचार आजही भक्तांच्या स्मरणात आहेत.

Discussion about this post