मोहोळ तालुका प्रतिनिधी-बापुसाहेब घळके.-दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामध्ये सुद्धा अनगर व परिसरातील तेरा गावातील शेतकरी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करताना बैलांची सजावट करून वाजत गाजत गावातील वेसीमधून मारुती मंदिरास बैलासह फेरी मारून, अनगर सिद्ध मंदिरास प्रदक्षिणा झाल्यानंतर बैलांना घरी नेवून पुजन आणि पुरणपोळी चा नैवेद्य दाखविल्या नंतर वर्षभर बैलांना संभाळणारे बैलकरी बांधवांना मालकाच्या वतीने बक्षीस आणि पुरणपोळी खीरीचे जेवण देवून सद्भावना व्यक्त केली गेली.घाटुळे नर्सरी मध्ये प्रगतशील शेतकरी सुनील घाटुळे यांनी सपत्नीक बैलपोळा साजरा केला.
अनगर येथे माजी आमदार राजनजी पाटील यांच्या मातोश्री वाड्यामध्ये बाळराजे पाटील व अजिंक्यराणा पाटील दोन्ही बंधूंनी बैलांची पारंपरिक पद्धतीने पुजा करून पुरणपोळी चा नैवेद्य दाखवून बैलपोळा सण साजरा केला…
Discussion about this post