महामहीम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उदगीर येथे नव्याने उभारलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांतून हे भव्य बुद्ध विहार साकारले असून, त्याचा मला विशेष आनंद आहे. हे भव्य बुद्ध विहार एक प्रेरणास्थान म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा विचार समाजात पसरवण्याचे कार्य अखंड करील.
राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मूजी प्रथमच उदगीरमध्ये येत असून, आपल्या सर्वांना त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करायचे आहे. चला तर मग आपण या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊ या…
उदगीर तालुका प्रतिनिधी :-गौतम भिवाजी कांबळे.
Discussion about this post