वर्षभर काम करणाऱ्या बैलांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!
शिरुर कासार : शिरूर तालुक्यातील वारणी गावांमध्ये मोठ्या उत्साहात बैल पोळा सण साजरा करण्यात आला. यंदा मुबलक पाऊस झाल्याने दुष्काळाचे संकट टळले आहे.


यामुळे बळीराजाच्या आनंदात भर पडल्याने बैलपोळा डी जे लावून वाजत गाजत मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा.
हा सण सर्जा-राजाला समर्पित असून, या सणानिमित्त वारणी गावामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. पोळ्याच्या सणाला गावातील सर्व जाती-धर्माचे लोकांनी एकत्र येऊन बैलपोळा सण साजरा केला.
यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, लहान थोर व्यक्ती व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन बैलपोळा सण साजरा केला.
Discussion about this post