धनुर्विद्या सारख्या कठीण खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी दौंड मधील बहीण भावाची निवड
पुणे सोलापूर महामार्गावरील चौफुला (धायगुडेवाडी) येथील प्रसिद्ध तुळजाभवानी हॉटेलचे मालक, श्री. ज्ञानदेव उर्फ पिलूशेठ गडधे यांचे चिरंजीव आदित्य व कन्या ज्ञानेश्वरी गडधे यांची ताईपेई, चायनीज येथील एशियन आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.यामुळे दौंड तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे
धनुर्विद्येसारख्या कठीण खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या दोन्ही सख्या भाऊ बहिणीची निवड होणे ही दौंड तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. आदित्य व ज्ञानेश्वरी यांचे हार्दिक अभिनंदन व स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आमदार राहुल दादा कुल यांनी व्यक्त केल्या
Discussion about this post