चामोर्शी:-गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने आयोजित
तालुका स्तरीय ग्रंथ प्रदर्शनी उत्सव दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी गट साधन केंद्र चामोर्शी येथे साजरा करण्यात आला.शासन निर्णय २२ नोव्हेंबर २०२३ नुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्र वाचन चळवळ दिनांक ५ डिसेंबर २०२३ पासून राबविण्यात येत आहे.वाचन चळवळीतील यश प्राप्त झाल्यानंतर महावाचन-२०२४ हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
महावाचन उत्सव मध्ये विद्यार्थ्यांनी स्टाल लावून पुस्तकांचे वाचन केले. वाचनामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व फुलते.क्षितीजे रूंदावतात,ज्ञानवृद्धी होते, विचारशीलता वाढीसोबतच कृतिशीलता व सकारात्मकता निर्माण होते.
उपक्रमाची उद्दिष्ट्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे.
विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे.मराठी भाषा,मराठी साहित्य,मराठी संस्कृतीची नाड जोडणे.दर्जेदार साहित्य व लेखक- कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे.
आज तीन गटातील (इयत्ता ३ री ते ५ वी, इयत्ता ६ वी ते ८ वी व इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतचे)विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
सहभागी विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाच्या पुस्तकांची स्टाल लावली होती.
महावाचन उत्सव-२०२४ अंतर्गत तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत टेंभुर्णे गटशिक्षणाधिकारी पंचायत समितीचा चामोर्शी हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून गट साधन केंद्र चामोर्शीचे गटसमन्वयक चांगदेव सोरते,केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे सर,माणिक वरपडे सर,उपक्रम प्रमुख घनश्याम वांढरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय साधन व्यक्ती कु.सरलक्ष्मी यामसनी यांनी केले तर आभार प्रदर्शन विषय साधनव्यक्ती कु वंदना चलाख यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गट साधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Discussion about this post