.
😱लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मची आता होणार कसून तपासणी, नेमकं कारण काय?
➖➖➖➖➖➖➖
▪लाडकी बहीण योजनेबाबत अनेक गैरप्रकार समोर येऊ लागले आहेत, या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
▪काही पुरूषांनी महिलांच्या नावे आपले अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. तर काही ठिकाणी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बायकोचे 26 अर्ज दाखल केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
▪सप्टेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी भरल्या जाणाऱ्या अर्जाची कडक तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सॉफ्टवेअरमध्ये अपडेट आणि बदल करण्यात येणार आहे. आधार क्रमांक कोणत्या बँकेशी लिंक आहे याची चौकशी केली जाणार आहे. तालुका, जिल्हा तसेच जिल्हा प्रशासनाकडून अर्जाची पुन्हा तपासणी करण्याशिवाय आणखी काही निकषांद्वारे अर्जाची तपासणी करण्यात येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖
Discussion about this post