मा.सर्वोच्च न्यायालयाने 01 ऑगस्ट रोजी घेतलेल्या अनुसूचित जाती उपवर्गीकरण निर्णयाच्या समर्थनार्थ व अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची पद्धत निश्चित करण्यासाठी ता.04 सप्टेंबर रोजी सकल मातंग समाज समन्वय समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर झालेले “आयोग दो आंदोलन” हजारो कार्यकर्ते व समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या हर्षोत्सवात संपन्न झाले…. अन यांवेळी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकडे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी दिली गेली हे मी माझे परमभाग्य समजतो. यांवेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार मा.अमितजी गोरखे यांनी राज्य सरकारच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरण या विषयांवर सरकारतर्फे आपले मत व्यक्त करतांना अत्यंत सकारात्मक भूमिका मांडून कितीही विरोध झाला तरी देखील लवकरच या विषयांची अंमलबजावणी करुन आरक्षण उपवर्गीकरण निश्चित होईल व अनुसूचित जाती समूहातील वंचित समाजाला उचित व रास्त न्याय मिळेल असे मत आपल्या भाषणांत व्यक्त केले.
याप्रसंगी विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमितजी गोरखे, युवा नेते परिमल मधुकरराव कांबळे, माजी आमदार राम गुंडेले, सकल मातंग समाज समन्वय समितीचे गणपत भिसे, रणधीर भाऊ कांबळे, शंकर तडाखे, प्रा.रामचंद्र भरांडे, सचिन बगाडे, अशोक आल्हाट, सागर रणदिवे, अंगद वाघमारे, मोहन कांबळे, सतीश बुरुडे, ऍड विलास साबळे, डॉ.भास्कर साळवे, संजय गालफाडे, अविनाश मोरे, नामदेव घोरपडे, कुणाल गायकवाड, कांतीलाल जगधने, परमेश्वर बंडेवार, भारत गायकवाड, प्रा.राजेंद्र लोधेकर, गंगाधर कोतेवार, विक्रम मिसाळ आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.. तर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली असून राज्यांतील विविध जिल्ह्यांतून आलेल्या समाजबांधवांची या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थिती होती..!!




Discussion about this post