फुलंब्री, दि. ६रामेश्वर विद्यालय, वाघोळा येथे मुलींसाठी आयोजित १२ दिवस चाललेल्या शिवकालीन स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणात प्रशिक्षक शरद पाटील यांनी मुलींना शिवकालीन स्वसंरक्षणाच्या विविध तंत्रांचे शिक्षण दिले.
या प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला व त्यांना स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे १२ दिवस मार्गदर्शन मिळाले.समारोपाच्या अध्यक्षस्थानी पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे संचालक श्री. सर्जेराव ठोंबरे सर होते. त्यांनी मुलींशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला व स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
प्रमुख पाहुणे उद्योजक श्री. अभिषेक कादी यांनीही मुलींशी संवाद साधत त्यांच्या प्रशिक्षणातील समर्पणाची प्रशंसा केली व भविष्यात निर्भय राहण्याचा सल्ला दिला.प्रमुख पाहुणे म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे सचिव श्री. निवृत्ती पाटील गावंडे, संचालक श्री. जब्दे सर, शालेय समिती अध्यक्ष श्री. विकास पाटील गायकवाड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. भगवान उबाळे यांनी, प्रशिक्षण कालावधीतील संक्षिप्त माहिती क्रियाशिक्षक श्री संतराम मोरे यांनी तर सूत्रसंचालन श्री. चव्हाण यांनी, तर आभार श्री. कैलास व्यवहारे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संदेश सोनवणे गौतम पाखरे व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी योगदान दिले. पालक वर्गातून माणिकराव पाटील गायकवाड, कचरू बाबुराव गायकवाड, बाबुराव गायकवाड, काकाजी गायकवाड, रामेश्वर गायकवाड, बाळू वाहुळ, चंद्रकलाबाई भगवान गायकवाड, लक्ष्मीबाई काकाजी गायकवाड, विमलबाई बाबुराव गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पालक उपस्थित होते. या शिबिरामुळे विद्यार्थिनींनी आत्मसंरक्षणासाठी आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले, तर पालकांनी मुलींच्या सुरक्षिततेची चिंता कमी झाल्याचे समाधान व्यक्त केले.
Discussion about this post