कुरुंदवाड / भाग्योदय सांस्कृतिक गणेश मंडळाच्या गणरायांचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले असून या सोहळ्यासाठी कुरुंदवाड तसेच कुरुंदवाड बाहेरील भाविकांनी अलोट गर्दी केल्याने साने गुरुजी विद्यालय पासून ते कुरुंदवाड नगरपरिषद पर्यंतच्या रस्त्यावर उत्साह संचारला होता.
तसेच भाग्योदय सांस्कृतिक गणेश मंडळांने पारंपारिक ढोल ताशा वाद्याचा वापर केल्याने कुरुंदवाड शहरातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. उद्याही मोठ्या प्रमाणात कुरुंदवाड शहरात गणरायाचे आगमन होणार असल्याने विविध कुरुंदवाड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे सज्ज झाली आहेत.
Discussion about this post