


निंबाळे येथे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याची परंपरा बऱ्याच काही वर्षांपासून चालू आहे. त्या यात्रेनिमित्त नऊ तारखेपासून दररोज संध्याकाळी नाशिक जिल्ह्यातून खूप नामांकित वाघे मंडळ यांनी हजेरी लावली व यात्रेची शोभा वाढवली.बारा गाड्या ओढण्याचे मानकरी डॉक्टर संकेत संजय गायकवाड हे होते.
डॉक्टर गायकवाड हे चांदवड तालुक्यात पशुवैद्यकीय म्हणून डॉक्टर प्रसिद्ध आहे.त्यांनी पशुवैद्यकीय क्षेत्रात खूप नाव लगीन केले आहे.दहा-बारा वर्षांपूर्वी त्यांनी खंडेराव महाराज गाड्या ओढन्याचे नारळ ठेवले होते.
त्या गाड्यांचा मान त्यांना ह्यावर्षी भेटला त्यामुळे त्यांनी खूप मोठा उत्साह दाखवला.पूर्ण गावांमध्ये लाइटिंग खूप लांबचे लांबचे वाघे मंडळ फटाक्यांची आतषबाजी सर्व काही गावाचे रूपच काल बदलून टाकले होते.तसेच संध्याकाळी घरी महाप्रसादाचा कार्यक्रम व आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत त्यांनी केले.पुढील भावी पिढीला खूप असा चांगला संदेश त्यांनी काल दिला.यात्रेच्या निमित्ताने
या यात्रेसाठी गावातून बाहेरगावी नोकरीसाठी गेलेले सर्व नागरिक या निमित्ताने काल एकत्र आले व यात्रेचा आनंद घेतला.यात्रेच्या निमित्ताने गावी आलेल्या मित्रांच्या गप्पाच्या मैफली रंगल्या होत्या व खूप खूप आनंद घेतला. आलेल्या सर्व वाघे मंडळींनी केलेल्या सहकार्याबद्दल डॉक्टर गायकवाड व त्यांच्या कुटुंबाने सर्वांचे आभार मानले…
Discussion about this post