उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील शेतकऱ्याला पीक विमा मिळावा म्हणून सत्ताधाऱ्यांनी जे प्रयत्न करायला हवे होते, ते न केले गेल्यामुळे सन 2023 या हंगामातील पिक विमा शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. एका अर्थाने राज्यकर्त्यांनी शेतकऱ्याकडे केलेले सर्वच बाजूचे दुर्लक्ष याचे परिणाम निश्चित येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये भोगावे लागतील, असे चिन्ह एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेल्या शेतकरी न्याय मोर्चातून दिसून येत आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी हितासाठी लोक रस्त्यावर उतरले ही एक आनंदाची बाब आहे. मात्र शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावे लागावे, ही सरकारच्या दृष्टीने शरमेची बाब आहे. असे विचार गंगापूर भाकसखेडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी मोर्चाला उद्देशून बोलताना मांडले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते रंगा राचुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित या लोकांकडे सरकारचे लक्ष नाही. त्यामुळेच आंदोलनात्मक पावले उचलावी लागत आहेत, असे सांगितले. पिक विम्याची रक्कम मिळेपर्यंत सरकारला धारेवर धरण्या शिवाय बळीराजाच्या हातात काहीही नाही. त्यामुळे आक्रमक होणे गरजेचे आहे. भविष्यात आपल्याकडे येणाऱ्या पुढार्यांना या संदर्भात चा विचारावा या दृष्टीनेही तयारी करण्याचा निर्णय या मोर्चातून करण्यात आला.
या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन विवेक जाधव, बसवराज पाटील मलकापूरकर, दयानंद रोडगे, मनमत कोणमारे, संगमेश्वर मिटकरी, शिवाजी पाटील, वैजनाथ केसगिरे, रामराव पाटील, अण्णाराव गंभीरे, अण्णाराव मद्दे , विठ्ठलराव मुळे, बाळासाहेब जाधव, श्रीरंग कुंडगीर, शिवा पाटील, अशोकराव माने, देविदास करकले, धनाजी गंगनबिडे ,धोंडीबा डावळे, गणेश शेटकर, गंगाधर बिरादार, कालिदास दंडीमे, कुमार पाटील, प्रल्हाद महाजन, कल्लप्पा पाटील, वीरभद्र पाटील, व्यंकट कुंडगीर यांच्यासह
उदगीर तालुक्यातील अनेक चेअरमन आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक उपस्थित होते. तसेच उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस उषा कांबळे, बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, पद्माकर उगिले, ज्ञानेश्वर पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शीलाताई पाटील, चारुशीला पाटील, नाना ढगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, अरूनाताई लेंडाने,अनिल पंचाक्षरी प्रहार जनशक्ती पक्षाचे अमित खंदारे शेतकरी संघटनेचे प्रकाश रोडगे, यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post