भुम तालुका प्रतिनिधी|
भुम तालुक्यातील ढगे चिंचपुर या गावकऱ्यांनी
धाराशिव जिल्ह्यातील चिंचपूर ढगे गावात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा प्रचंड रोष उसळला. पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेल्यानंतर मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांना अडवून धरलं. “खिशात पैसे नाहीत, प्रशासनाला सांगतो” असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं. पण शेतकरी संतप्त झाले आणि “पाहणी दौरा म्हणजे नाटक का?” असा सवाल उपस्थित केला.या संपूर्ण संतापजनक परिस्थितीचा आढावा घेतन्यात आला आहे





