वार्ताहर प्रशांत माने नारायणगाव :-आज तुळजाभवानी महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था वारूळवाडी धनसंचय नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव चंद्रशेखर नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव सतोबा महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था धनगरवाडी. या सर्व संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या चारही संस्थेकडून सामाजिक उपक्रम घेतले जातात. तसेच उत्कृष्ट व होतकरू महिलांना पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातो.संस्थेतून गृह तारण कर्ज वाहन तारण कर्ज ठेवतारण कर्ज असे विविध प्रकारचे कर्ज देण्यात येतात. तसेच ठेवीवर वर विविध प्रकारचे व्याजदर दिले जातात. वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्याच्या नंतर सर्व संचालक मंडळ कर्मचारी रुंद यांना सहकार प्रशिक्षण देण्यात आले. या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे अमित बेनके उपस्थित होते .या सभेत तुळजाभवानी पतसंस्थेचे चेअरमन सौ कोमल ताई को-हाळे उपाध्यक्ष मुक्ताई किसन मेहेर सेक्रेटरी शशिकला श्रीराम धानापुणे संचालिका सीमा तांबे मुख्य कार्यकारी अधिकारी सरिताताई मावळे तसेच चंद्रशेखर पतसंस्थेचे चेअरमन धनंजय को-हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जयश्री चिंचवडे तसेच धनसंचय पतसंस्थेचे चेअरमन कैलास भाऊसाहेब वाघ सेक्रेटरी रेहान भाई कुरेशी सह सेक्रेटरी संतोष सासवडे संचालिका वैजयंती ताई को-हाळे मुकुंद कोल्हे मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत मोरे तसेच सतोबा महाराज पतसंस्थेचे चेअरमन रसूल हसन शेख सर्व संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी टेंभेकर साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास अभंग यांनी केले. तसेच संस्थेचे सल्लागार संदीप जी नाईक यांनी आभार मानले.
Discussion about this post