राहू प्रतिनिधी-दौंड तालुक्यातील राहू येथील शंभूराजे युवा प्रतिष्ठानच्यावतीने गणेश फेस्टिवल 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला राहू परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. रविवार दिनांक 8 रोजी प्रसिद्ध गायक अभिजीत जाधव व अनु जाधव यांच्या शिवगीत ,गोंधळ व स्फूर्ती गीताच्या कार्यक्रमाला राहू परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
प्रतिष्ठानच्यावतीने सोमवारी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दिगंबर महाराज जाधव यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार दिनांक दहा रोजी पूना ब्लड बँकेच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते .यावेळी परिसरातील सुमारे 100 नागरिकांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले.
मंगळवार दिनांक 10 रोजी जादूगर ईश्वर यांच्या कार्यक्रमाला परिसरातील बालचिमुकल्यांनी हजेरी लावत कार्यक्रमाचा आनंद लुटला.यावेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल,माजी आमदार रंजनाताई कुल, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष कांचनताई कुल यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या
.बुधवारी व गुरुवारी शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आले आ.शुक्रवारी बक्षीस वितरण व शनिवारी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती शंभूराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.
Discussion about this post