सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका स्थापन होऊन बावीस एक वर्ष झाली तरीही अजूनही येथील नागरिकांना महापालिकेकडून किरकोळ गोष्टी साठी अजूनही झगडावे लागत आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या घरातील कचरा हा आपण सर्वच रोजच्या रोज काढत असतो व तो बाहेर ठेवत असतो महापालिकेची घंटा गाडी तीही वेळेवर न येणारी वाट पहात बसतो मग तो कचरा घंटा गाडीत भरला जातो. अजूनही मिरज मधील कित्तेक वार्ड मध्ये घंटा गाड्यांची अनियमितता कायम असल्याचे चित्र आहे.
मात्र जिथे घंटा गाड्या नेहमी वेळेवर येतात तिथेही नागरिकांची बेशिस्त हि काही कमी झालेली नाही. मिरजेतील ब्राह्मणपुरी भागातील भर वस्तीत भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर येथील नागरिक दिवसाढवळ्या कचरा रस्त्यावर टाकतात. या ठिकाणी तर रोज घंटा गाडी चे अस्तित्व दिसून येते. मात्र नागरिकांच्या या बेशिस्त पुढे प्रशासनानेही हात टेकले आहेत.
मिरजेच्या विस्तारित भागात असणाऱ्या रमा उद्यान आणि साई नंदन कॉलोनी आणि इतर हा भाग उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो मात्र या ठिकाणी तर घंटा गाडी आठवड्यातून दोन ते तीन वेळच आपले अस्तित्व दाखवते येथील काही नागरिकांशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता अत्यंत नाराजीच्या सुरामध्ये ‘महापालिकेला वेळेवर कर भरूनही आम्हाला सोई सुविधा मिळत नसतील तर महापालिकेचा काहीही उपयोग नाही’ अशा शब्दात नाराजी व्यक्त होत आहे. आज महापालिकेने घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा मोठा गाजा वाजा केला आहे घन कचरा प्रकल्प प्रमुख डॉ रवींद्र ताटे यांचेही निवासस्थान या रमा उद्यान परिसरात आहे मात्र घंटा गाडी बाबत ते काहीही बोलण्यास तयार नाहीत.
Discussion about this post