दौंड तालुका प्रतिनिधी – धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब आणि दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत / अनुदानित उपचार देण्यासाठी इंडिजेंट पेशंट फंड (IPF) योजनेच्या अंमलबजावणी बाबतच्या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे अपर जिल्हाधिकारी श्री. अजय मोरे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली.
या प्रसंगी आमदार मा. श्री. अशोक पवार, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीम. ज्योती कदम, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, योजेनमध्ये समाविष्ट पुणे शहर व जिल्ह्यातील रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही माहिती दौंड तालुका्यायाचे आमदार राहुल दादा कुल यांनी दिली.
वेळी धर्मादाय रुग्णालयांद्वारे निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी करण्यात आलेल्या उपचारांचा आढावा घेण्यात आला तसेच या योजनेचा लाभ अधिकाधिक गरीब आणि दुर्बल रुग्णांना मिळावा यासाठी योग्य निर्देश देण्यात आले.
बोरमलनाथ येथे महाआरोग्य शिबिर
तसेच दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी श्री. क्षेत्र बोरमलनाथ मंदिर, बोरीपार्धी (चौफुला), ता. दौंड येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले असून त्यामध्ये सर्व रुग्णालयानी सहभागी व्हावे यासाठी सर्वांना निमंत्रित केले.
आव्हान
गरजुनी या महाजन आरोग्य शिबीराचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राहुल दादा कुल यांनी केले आहे
Discussion about this post