मोहोळ/प्रतिनिधी-बापू घळके
मोहोळ तालुक्यातील अनगर व परिसरातील बिटले,खंडोबाचीवाडी, वाफळे, कुरणवाडी,नालबंदवाडी, बोपले,कोंबडवाडी,देवडी, पासलेवाडी,मलिकपेठ,गलंदवाडी यासह आदी बारा गावामध्ये महिलांनी गौरी लक्ष्मीचे पूजन करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
गौरी- लक्ष्मीच्या आगमनासाठी महिला भाविक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते.नवीन लक्ष्मीच्या मूर्ती घेण्यासाठी अनगरसह आदी ठिकाणच्या आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणावर महिलांनी गर्दी केली होती.गौरी लक्ष्मीच्या स्वागतासाठी महिलांनी घरासमोर सडा टाकून मोठ्या व आकर्षक रांगोळी काढल्या होत्या.
मानाच्या भाजी भाकरीचा नेवैद्य दाखवून विधिवत पूजा करण्यात आली. चालू पावसाळ्यात सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.गौरी -लक्ष्मीच्या आगमनाबरोबर मागील पाच सहा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेल्या पावसानेही हजेरी लावल्याने महिलामध्ये अधिकच समाधान पसरले होते.


Discussion about this post