मोहोळ/प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ,पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, करमाळा, माळशिरस, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या तालुक्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक कांदा लागवड झाली असून.
चालू वर्षी सोलापूर जिल्ह्यात साडे पाच लाख मे. टन कांदा उत्पादन होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा समाधानकारक पाऊस झाला असून उजनी धरणा बरोबर जिल्ह्यातील लघु-मध्यम प्रकल्पातही मुबलक पाणी साठा असल्याने चाळीस हजार हेक्टर वर कांदा लागवड झाली आहे, गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोलापूर जिल्ह्यातील कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली.
असून अजूनही कांदा लागवड चालूच आहे. कांदा पेर पद्धतीने लागवडीसाठी कमी खर्च येत असल्याने शेतकरी पेर पद्धतीचा अवलंब करत आहेत. जिल्ह्यातील कांदा मार्केट मध्ये विक्री साठी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये येतो, या वर्षी निर्यात बंदी होणार नाही या आशेने लागवड क्षेत्र वाढले असून सरासरी तीन हजार रुपये पर्यंत तरी भाव मिळेल अशी शेतकर्यांना अशा आहे.
Discussion about this post