राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यार्थी संघटनेच्या प्रदेश सचिवपदी सुदर्शन कादे यांची निवड..
मोहोळ/ प्रतिनिधी -मोहोळ तालुक्यातील वाळुज विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुदर्शन सुहास कादे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यार्थी संघटनेच्या प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष प्रशांत कैलासराव कदम यांनी कधी यांना निवडीचे पत्र दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजित दादा पवार यांचे मार्गदर्शनाखालीनुसार व प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव पदी सुदर्शन कादे यांच्या पत्र दिले आहे. सुदर्शन कादे यापूर्वी तालुका,जिल्हास्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे काम केले आहे.
सुदर्शन कादे यांच्या निवडीबद्दल मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील, विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या शुभहस्ते अनगर नगरपंचायत मध्ये सत्कार करण्यात आला. तर या निवडीबद्दल आ यशवंत माने,लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे यांच्यासह आदींनी अभिनंदन केले.
Discussion about this post