कुंभोज ता,१२आज हातकणंगले पोलीस निरीक्षक मा.श्री.शरद मेमाणे साहेब यांची भेट घेऊन रात्रीच्या अंधारात गावावरती व परिसरात उडणाऱ्या ड्रोन संदर्भात सविस्तर चर्चा केली त्यावेळी त्यांनी…
1) नागरिकांनी घाबरू नये व दक्ष रहावे
2) अजूनही आमच्या कोणत्याही हद्दीत ड्रोनद्वारे अनुचित प्रकार घडला नाही.
3)चोरीच्या घडणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी पोलीस गस्ती पथक वाढवण्यात आले आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
4) सदर ड्रोन च्या घटना या बाजूच्या सांगली,सोलापूर व इतर जिल्ह्यात ही घडत असल्याची बातमी येत आहे.
5) मोबाईलवर फिरणाऱ्या msg वरून नाशिक येथील तपास यंत्रणा उल्लेखा संदर्भात आम्हाला अजून वरिष्ठांकडून माहिती आलेली नाही.
6)आम्हाला अधिकृत माहिती प्राप्त झाल्यास नागरिकांना सूचना देण्यात येतील.
7)तरी नागरिकांनी ड्रोन पाहून गोंधळ अथवा घाबरून जाऊ नये व विनाकारण msg व्हायरल करू नये.
8)अनोळखी इसम अथवा संशयास्पद हालचाल दिसल्यास कायदा हातात न घेता तात्काळ 112 या हेल्पलाईन नंबर वर कॉल करा.
____________________
अशी यावेळी माहिती दिली. यावेळी विनायक पोतदार,बाळासाहेब डोने,सत्यजित तोरस्कर,निवास माने,सागर सुवासे,दिपक कोळी,सुरेश भगत,सचिन भानुसे आदी मान्यवर उपस्थित होते
सारथी महाराष्ट्राचा हातकणंगले तालुका प्रतिनिधी रईस मुजावर कुंभोज.
Discussion about this post