नायगाव तालुका प्रतिनिधी…
दिपक गजभारे घुंगराळेकर…
नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या मौजे राहेर येथील गोदावरी नदीकाठच्या परिसरात अत्यंत सुंदर व अतिशय मनमोहक वातावरण असलेल्या लक्ष्मी नरसिंह मंदिर तसेच चक्रधर स्वामी मंदिर असून या परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन 25 कोटी रुपयांच्या वर हा निधी आला असून ह्या बांधकामाची व कामाची पाहणी करत असतानाच यावेळी तहसीलदार धम्म प्रिया गायकवाड नायगाव व मंडळ अधिकारी आर के पवार कुंटूर यांच्या हस्ते अनेक विविध जातींच्या वृक्षा ची लागवड करण्यात आले .
यावेळी मंदिराचे विश्वस्त श्री जोशी तसेच ग्रामपंचायत सरपंच राहेर नरवाडे, तलाठी डाकेवाड राहेर, तलाठी पांडुरंग हाके सांगवी, ग्रामविकास अधिकारी राहेर ,तंटामुक्त अध्यक्ष सरपंच गावातील मंडळ सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते . तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्या हस्ते लक्ष्मी नरसिंह मंदिरच्या पर्यटन स्थळावर व त्यांच्या आवारामध्ये तसेच नदीकाठी आणि जिल्हा परिषद शाळा राहेर आणि गावात मधील रस्त्याच्या कडेला असे विविध तीनशे जातीच्या वृक्षाची लागवड तहसीलदार नायगाव यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले.
यावेळी गावातील समस्त नागरिक व परिसरातील ही नागरिक उपस्थित होते .राहेर मंदिर परिसराला. कोटी रुपयांचा निधी देऊन येथे लक्ष्मी नरसिह मंदिर व श्रीकृष्ण मंदिर तसेच महानुभाव पंथांचे आद्य चक्रधर स्वामी हे मंदिर परिसर हे मोठ्या प्रमाणात उजळून निघत आहे. या परिसराची माहिती घेत तहसीलदार व मंडळ अधिकारी आर के पवार यांच्या सह नदीकाठच्या मंदिर परिसरामध्ये तसेच शाळा जिल्हा परिषद राहेर, मध्ये सुद्धा जाऊन विविध 300 जातीची प्रजातीच्या वृक्षाची लागवड केली आहे…..
Discussion about this post