दौंड तालुका प्रतिनिधी- बोरीपार्धी महा आरोग्य शिबिर गुरुवार 19/ 9/ 24 रोजी बोरमलनाथ मंदिर बोरीपार्धी (चौफुला) ता. दौंड ,जि. पुणे येथे आयोजित केले आहे तरी या शिबिराचा सर्व गरजूंनी लाभ घ्यावा असे आव्हान दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल यांनी केले आहे.
कै.सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॉरिटेबल ट्रस्ट
कै. सुभाष अण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट,
सार्वजनिक आरोग्य विभाग, धर्मादाय संलग्न रुग्णालय, पुणे जिल्हा परिषद ,आरोग्य विभाग, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, ससून रुग्णालय पुणे, दौंड रुरल मेडिकल असोसिएशन ,दौंड मेडिकल असोसिएशन निमा दौंड, इंडियन मेडिकल असोसिएशन दौंड, इंडियन डेंटल असोसिएशन दौंड, दौंड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, भीमथडी शिक्षण संस्था दौंड, रोटरी क्लब ऑफ दौंड, नेताजी शिक्षण संस्था सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय केडगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने महा आरोग्य शिबिर आयोजित केले आहे.
रुग्णांनी शिबिरात येताना आणावयाची आवश्यक कागदपत्रे
१)शिबीरात येताना रुग्णांनी त्यांचा मोबाईल नंबर पूर्वीच्या आजारासंदर्भाची फाईल तसेच रिपोर्ट्स बरोबर घेऊन यावे
२) शिबिरात येताना आवश्यक कागदपत्र बरोबर घेऊन यावे.पिवळे रेशनकार्ड किंवा केशरी रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक
शिबिर नाव नोंदणी .
१) उपजिल्हा रुग्णालय दौंड,
२) ग्रामीण रुग्णालय यवत,
३)ग्रामीण रुग्णालय वरवंड,
४) तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र,
५) तालुक्यातील जवळचे खाजगी डॉक्टर्स व हॉस्पिटल.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा ७०३८६६७७९९
महाआरोग्य शिबिरात पुणे जिल्ह्यातील 35 पेक्षा जास्त मोठी हॉस्पिटल सहभागी झालेले आहेत.तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
Discussion about this post