आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून आज 75 वर्ष उलटून गेला आपण देशाचा अमृत महोत्सव देखील मोठया संख्येने साजरा केला देश एकीकडे मंगळावर आकाशात झेप घेत असताना एकीकडे त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते मात्र आजही ब्रिटिश कालीन पेक्षही वाईट असल्या सारखे आहेत त्रिंबक तालुक्यातील मागील काही दिवसापूर्वी रस्ता ओलांडताना एकाचा पाय घासरून मृत्यू झाला .
अशा अशा घटना तालुक्यामध्ये आनेक ठिकाणी घडत असतान देखील सरकार ह्या गोष्टी कडे लक्ष देत नाही तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गावातील ग्रामपंचायत मधील वाडीपाड्यांच्या रस्त्यांची चाळण झाली बऱ्याच ठिकाणी रस्त्यात खड्डे पडलेले आहेत की खड्यात रस्ते समजत नाही, रात्री बेरात्री या रस्त्याने अनेक वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत वाहने चालवताना मोठ्या समस्या येते, तसेच काही ठिकाणी मात्र रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले आहेत,अशाने अपघात होवू शकतो.ऐन निवडणूकीच्या तोंडावर इच्छुक उमेदवारांची गर्दी पहायला मिळत आहे, मात्र समस्यांवर कोणताही उमेदवार बोलताना दिसत नाही, लोकप्रतिनिधींनी अशा वाड्या पाड्यावर लक्ष देऊन व्यवस्थित काम केले पाहिजे, लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे . अशी समस्त गावकऱ्यांची मागणी आहे.
Discussion about this post