मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर या उपक्रमात रांजणी येथील जि. प. शाळा जामनेर तालुक्यात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.
जि. प.शाळा रांजणी ( प्रथम) तीन लाख रुपये
जि. प.शाळा सोनाळा ( द्वितीय) दोन लाख रुपये
जि.प. शाळा नवी दाभाडी ( तृतीय ) एक लाख रुपये
असे बक्षीस जाहीर झाले आहे. यानिमित्ताने शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी यांचे तालुकाभरातून कौतुक केले जात आहे.
रांजणी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश मावरे तसेच श्री मोहन खोनगरे सर व सर्व शिक्षकांचा सत्कार करताना विद्यार्थी.
Discussion about this post