
- पांढरकवडा येथील इसमाचा पाटणबोरी नदीत मृतदेह आढळला
- दि ३ ऑगस्टला दुपारी १ वाजता च्या सुमारास बोरी खुनी नदीच्या पात्रात कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये काही भोई समाज बांधवांना एक हात बाहेर पाण्यात निघालेला दिसून आला. अधिक पाहणी केली असता तेथे मृतदेह अटकून असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी पांढरकवडा पोलीस स्टेशनला माहिती दिली. दि.३ ऑगस्टला दुपारी दोन वाजता चे दरम्यान पांढरकवडा पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर पांढरकवडा पोलीसाची टीम २ वाजता नदी जवळ पोहोचली. मात्र नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला असल्यामुळे पोलीस आतमध्ये जाऊ शकत नव्हते. तेव्हा त्यांनी तीन ते चार भोई समाजाच्या बांधवांना बोलवून त्यांच्या मदतीने मृतदेहाजवळ पोहोचले व अथक प्रयत्नानंतर तीन ते चार तासानंतर सदर मृतदेह नदीच्या बाहेर काढण्यात आला. मृतदेह काढल्यानंतर पाटणबोरी येथील आउट पोस्ट मध्ये आणण्यात आला. पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत १ ऑगस्टला मिसिंग रिपोर्ट आली होती. मधुकर पिंपळे राणा प्रताप वार्ड (५८) नावाचा हे इसम १ ऑगस्ट पासून बेपत्ता असल्याची मिसिंग रिपोर्ट पांढरकवडा येथे नोंद होती. त्या आधारावर पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांना संपर्क साधला. मृतकाचे कुटुंबीय पाटणबोरी येथे पोहोचले व त्यांनी
- सदर इसमाचा मृतदेह मधुकर पिंपळे यांचाच असल्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. घटनास्थळावर जाऊन मृतदेह काढणाऱ्यांमध्ये पाटणबोरी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज रमाकांत खंडारे, ए.एस.आय. संजय रामगडे, जमादार राम राठोड, किशोर आडे व सूर्यकांत गीते आदींनी परिश्रम घेतले. भोई समाज बांधवांमध्ये संतोष बावणे सह तीन ते चार समाज बांधवांनी मदत केली.
ता. प्र. गणेश बेतवार
Discussion about this post