पैगंबर जयंती ईद-ए-मिलाद निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
बार्शी –
येथील सुभाष नगर येडाई विहीर रोड या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून ईद-ए-मिलाद पैगंबर जयंती निमित्त व इकबाल बागवान यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी दिनांक 16 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात सर्व समाजातील बांधवांनी उत्साहात सहभाग नोंदवला
यावेळी 088 पिशव्या रक्त संकलन झाले असून विशेष सहकार्य बार्शी येथील राम भाई शहा रक्तपेढीचे लाभले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फ्रेंड सर्कल सुभाष नगर, अनिल मालक प्रतिष्ठान, बागवान सोशल फाउंडेशन,शेरे हिंद प्रतिष्ठान,अनवर बागवान मित्र मंडळ यांनी रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले…

Discussion about this post