
फुलंब्री येथे शासकीय आयटी कॉलेज मध्ये आज संविधान मंदीराचे उद्घाटन फुलंब्री प्रतिनिधी अमोल कोलते फुलंब्री येथील शासकीय
l.T.l कॉलेज येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था फुलंब्री मध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन समारंभ (आभासी पद्धतीने) भाजपा जिल्हाध्यक्ष सुहासभाऊ शिरसाठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
.याप्रसंगी भाजपा नेते श्री. तारू आप्पा मेटे, PSI अबुज मॅडम, माजी सभापती श्री. सर्जेराव मेटे, भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री. राम बनसोड, श्री. भगवान भाऊ निराशे, श्री.पी. बी. खोकले, गटनिदेशक
श्री.के. डी. ढोले, श्री.एन. आर सोनवणे,निदेशक, श्री.सोनटक्के सर निदेशक श्री. श्री.आगवन एस एस,भांडरपाल आणि शिक्षक व सौ. राजे मॅडम, शिल्पनीदेशिका सौ. मगरे मॅडम, मुख्यलिपीक, विद्यार्थी उपस्थित होते.
Discussion about this post