पट्टणकोडोली (तालुका हातकणंगले प्रतिनिधी):-सोन्याची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या पट्टणकोडोली मध्ये जोडीचे भगवान श्री विठ्ठल बिरदेव यांची सोन्याहून ही पिवळी होणारी जत्रा म्हणजेच महाराष्ट्रातील एक लक्षणीय व अविस्मरणीय ओळख आहे.
या जत्रेची तारीख ठरवणे व सोहळा संपन्न करणे याचा मान संकेश्वर मधील हेगडी प्रधान यांना परंपरागत आजतागायत चालू आहे. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी संकेश्वर प्रधान हेगडे यांनी मानाचे दुधाचे घागर श्री विठ्ठल बिरदेव चरणी अर्पण करण्यासाठी पट्टणकोडोली नगरीमध्ये पोहोचली आहे.
विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं अशा गजरात व भंडार्याच्या उधळणामध्ये त्यांच्या आगमनासाठी गावातील मानकरी, पुजारी, ग्रामस्थ व भक्तमंडळी असंख्य संख्येने जमा झाले आहेत. त्यांना ओवाळण्यासाठी (औक्षणासाठी) आरती, खाण्यासाठी गोड नैवेद्य, सुंदर व सुबक अशी रांगोळी, आतिषबाजी तसेच पायावरती गरम पाणी अशा वेगवेगळ्या पद्धतीने या मानाच्या दुधाच्या घागरीचे स्वागत पट्टणकोडोली वासियांकडून केले आहे.
आज सायंकाळी श्री विठ्ठल बिरदेव भागीरथीच्या चरणी आरती व पूजेनंतर दूध अर्पण केले जाईल. तसेच ग्रामपंचायत चावडी येथे येत्या एक ते दोन दिवसात पट्टणकोडोली विठ्ठल बिरूदेवाची यात्रा ठरविण्याचे तारीख हा सोहळा पार पडेल अशी माहिती विठ्ठल बिरदेव देवस्थान समितीकडून देण्यात आले आहे
Discussion about this post