गणेशोत्सवात खेमराज भाऊ नेवारे यांचा सक्रिय सहभाग..
सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव सगळीकडे मोठया उत्साहाने साजरा होत आहे .देसाईगंज येथे राजेंद्र वॉर्डातील विलासजी पोट्टूवार यांच्याकडे अनेक वर्षांपासून गणेश स्थापना करण्याची परंपरा आहे.
तेव्हा यावर्षी सुद्धा गणेश स्थापना करण्यातआली.आज काल्याचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी खेमराज भाऊ नेवारे यांनी आमंत्रणाला मान देऊन काल्याला उपस्थिती दर्शविली त्याप्रसंगी पोट्टूवार परिवाराने त्यांचे स्वागत करून आभार मानले.
तसेच फवारा चौक, देसाईगंज येथे गणेशोत्सवा निमित्त महाप्रसादीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात वेळात वेळ काढून खेमराज भाऊ नेवारे यांनी उपस्थिती दर्शविली त्याप्रसंगी मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून आभार मानले.
गणेश मंडळासाठी भाविष्यात कोण कोणत्या योजना व सोयी उपलब्ध करता येतील याविषयी चर्चा करण्यात आली. त्या संबंधी भाविष्यात कार्य करण्याचा निर्धार खेमराज भाऊ नेवारे यांनी केला.
आरमोरो विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी तळफदार नवीन युवा चेहरा.
Discussion about this post