प्रतिनिधी: सुधीर घाटाळ
गोट्या तर मुले घरोघरी खेळत होती.अख्ख्या महाराष्ट्रात श्रावण महिन्यात मैदानी खेळ खेळत असत. परंतु आज हे खेळ आपण विसरत चाललो आहोत.अशा प्रकारचे अगदी महाराष्ट्रातल्या मैदानी काही खेळ होते. हे आज सांगितले तर अनेकांना आश्चर्यच वाटेल. हे खेळ नेमके कुठले,पहिल्यांदा कधी खेळले गेले ? आज कुठे खेळले जातात का ?आपल्याकडे आज या प्रश्नांची उत्तरे नाहीत.महाराष्ट्राच्या या क्रिडा संस्कृतीचे वर्णन कुठेही लिहीलेले नाही. हा इतिहास कोणाला अवगत आहे का? हे ही सांगता येणार नाही.
आपली जीवन सरणी बदलली आणि आपण हे खेळ खेळायचे थांबलो. फारसे काही साहित्य न लागणार्या अशा या खेळांन मधून उत्तम व्यायाम तर होतोच पण आपल्यातले उपजत कला-कौशल्य पणाला लागते. सध्याच्या मोबाइल आणि कॉम्प्युटर ‘गेम्स’ च्या युगात लोकांनी एकत्र येऊन खेळायला अनन्य साधारण महत्व आहे.तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दुसरी बाजू ही की लोकांमधील तुटत चाललेला संवाद..या खेळांमुळे रोजच्या कामां मधून वेळ काढून लोक एकत्र येतात, खेळतात, करमणूक होते, संवाद वाढतो आणि मन प्रसन्न राहते. आपल्या संस्कृतीची आठवण म्हणून आपण येत्या पिढीला हे खेळ शिकवायला हवे.
त्याचप्रमाणे एक उदाहरण म्हणून डहाणू तालुक्यातून निकणे घाटाळपाडा येथे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सिजन मध्ये गोट्या (काचक्या, चुन्याच्या गोट्या) असे खेळांचा मुलांना विसर पडायला नको. म्हणून लहान मुलांन पासून ते मोठया लोकांन कडून हा खेळ वेळे नुसार हा खेळले जातो. या खेळात (गद वाली,घुस वाली, राजा/राणी, काचल्या जिखी) हे बोली भाषेतून खेळाचे प्रकार आहेत.हा खेळ काम करून आल्यावर संध्याकाळी व रात्री उशिरा पर्यंत उजेडाची सोय म्हणून फोकस लावून हा खेळ मनोरंजन, व्यायाम व्हावा म्हणून व एकत्र येऊन गप्पा गोष्टी व जुन्या आठवणी म्हणून जिवंत राहाव्यात म्हणून खूप मोठ्या उत्साहात मैदानी खेळातील गोट्या खेळ आता खेळाला जात आहे.
प्रत्येक वातावरणात वेगवेगळे खेळ खेळले जातात. यात आबा- डूबी, क्रिकेट,विटू- दांडू, कबड्डी, रस्सी खेच, पाण्यातील खेळ, व वेगवेगळे नाच गौरी नाच, टिपरी नाच, असे विविध प्रकारचे मनोरंजनात्मक व आरोग्यदायी खेळ खेळले जातात. असे वरील सर्व खेळ काम करून मिळालेल्या वेळात खेळ खेळले जातात.
वरील सर्व खेळ आताच्या घडीला मोबाईल मध्ये लपून राहिले आहेत. हे मोबाईल बाजूला ठेऊन मैदानी खेळाकडे या असा संदेश जन नायक बिरसा मुंडा मंडळ निकणे घाटाळपाडा येथील तरुण मुलांना मोबाईल पेक्षा मैदानी खेळाकडे येण्यास आव्हान करत आहे. हे खेळ आरोग्यासाठी व मनोरंजनासाठी खूप महत्वाचे आहे.
Discussion about this post