भोकर प्रतिनिधी राजकुमार पांचाळ (9657978196)
दि.18 सप्टें. तालुक्यातील मौ.पाळज येथे मागील 75 वर्षापासून गणेशोत्सव साजरा केल्या जातो. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि तेंलंगानामध्ये प्रसिद्ध असलेल्या या श्रीगणेशाची मुर्ती ही लाकडी मुर्ती आहे. अतिशय विलोभनीय व सुंदर असलेल्या या मुर्तीवरून गणेश भक्तांची नजर हटत नाही. प्रतीवर्षी आकरा दिवसच या मुर्तीचे दर्शन भक्तांसाठी खुले असते. त्यामुळे या आकरा दिवसात लाखोंच्या संख्येने भक्तगण नवसाला पावणाऱ्या या गणेशजींच्या उत्साहात सहभागी होतात.
पाळज येथील मंदिर समितीकडून श्री गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आकरा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये कथा, किर्तण, प्रवचन, लोककला, अशा विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमातून जनजागृती केली जाते. राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अन्नदानाच्या माध्यमातून या ठिकाणी दररोज दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत लाखों गणेशभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.
अनंत चतुर्दशीला श्री गणेशजींच्या मुर्तीच्या पालखीची मिरवणूक अतिशय शांततेत संपूर्ण गावभर काढली जाते. दिवसभर आणि रात्रभर चालणाऱ्या या मिरवणुकीत पंचक्रोशीतील भजन दिंड्यांसह विविध ढोल ताशा पथकांचा प्रामुख्याने समावेश असतो. या अतिशय उत्साहात होणाऱ्या बाप्पाच्या मिरवणुकीची सांगता पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजता बाप्पाच्या विसर्जणाने होते. श्री गणेशजींच्या या विलोभनीय लाकडी मुर्तीचे विसर्जण करून ती मुर्ती परत मंदिरामध्ये आणून ठेवली जाते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या श्रृध्देने,भक्तिभावाने आणि जड अंत:करणाने गणरायाला पाळजचे गावकरी आणि जवळपासच्या लाखों गणेश भक्तांनी निरोप दिला आहे.
Discussion about this post