नखाते विद्यालय कासापुरी या विद्यालयाचा मुलींचा कबड्डीचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ……….
…………………………………………..
शांताबाई नखाते विद्यालय कासापुरी या विद्यालयाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले असून 17 वर्ष वयोगटातील मुलीचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला असून
14 वर्षातील मुलीचा संघ तालुकास्तरावर द्वितीय क्रमांकावर राहिला असून दोन्ही संघाची आज झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे ऋतुजा राऊत श्रेया घाडगे शामल घाडगे विद्या घाडगे आरती घाडगे प्रतीक्षा भुमरे गायत्री भुमरे शिवानी कोल्हे अश्विनी खामकर सुप्रिया मोरे राधिका पाटील बोचरे यांचा समावेश आहे
या यशाबद्दल वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय अनिलभाऊ नखाते साहेब वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव तथा परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ भावनाताई नखाते मॅडम वाल्मीकि शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अजिंक्य भैय्या नखाते आदित्य भैया नखाते तसेच रमेश सरोदे सर
पाथरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय मुकेश राठोड साहेब प्रस्तुत शाळेचे मुख्याध्यापक महाजन सर उपमुख्याध्यापक रोकडे सर विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संघाचे व तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवलेल्या संघाचे अभिनंदन केले आहे व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
क्रीडा शिक्षक दूधमोगरे बी डी व पंढरी आघाव यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे
Discussion about this post