अखिल भारतीय राष्ट्रीय सचिव तथा सह-प्रभारी श्री.कुणालजी चौधरी यांची सागर कलाने यांनी भेट घेऊन केला सत्कार.
निष्ठावान कार्यकर्ता म्हणून दर्यापूर विधानसभा करिता सागर कलाने यांचा केला जाणार विचार कुणाल चौधरी
आज दि: १५/०९/२०२४ रोजी अमरावती येथील काँग्रेस भवनात जिल्हास्तरीय आढावा बैठक मुलाखत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . महाराष्ट्र आगामी निवडणूक २०२४ करिता अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण विधानसभेच्या उमेदवारांची थेट मुलाकात घेऊन त्याची चर्चा करण्यात आली.
या बैठकीत स्थानिक मुद्द्यांवर, जिल्ह्याच्या आढाव्याबद्दल सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी आढावा संपुर्ण माहिती घेतली आणि स्थानिक समस्यांवर उपाययोजना सुचवल्या.
येणारी निवडणूक तशी जिंकल्या जाईल यावर सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले.
यादरम्यान दर्यापूर विधानसभेचे प्रमुख तथा प्रबळ दावेदार काँग्रेसचे निष्ठावान पदाधिकारी प्रदेश महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु.जा.वि तथा युवक काँग्रेस सचिव सागर कलाने यांनी श्री. चौधरी साहेब यांची मुलाखत घेतली यादरम्यान त्यांनी संपूर्ण विधानसभेची संपुर्ण पार्श्वभूमी सखोल पद्धतीने समजून घेतली चौधरी यांनी सांगितले जो निष्ठावान कार्यकर्ता आहे खरं पक्षासाठी समर्पित आहे अशांना आम्ही यावेळेस नक्कीच संधी देऊ हे निश्चित आहे. ज्या समाजाला अद्याप पर्यंत संधी मिळाली त्यांचा सुद्धा विचार केला जाईल. या दरम्यान सागर कलाने यांनी आपल्या १८ वर्षाच्या केलेल्या कार्याची संपूर्ण माहिती देऊन संपूर्ण पार्श्वभूमी समजून सागितली..
या बैठकीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय सचिव महाराष्ट्र सह-प्रभारी कुणालजी चौधरी, . खासदार, बळवंतभाऊ वानखडे, माजी पालकमंत्री ॲड. श्रीमती यशोमती ताई ठाकुर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख मा.आमदार सुनिलभाऊ देशमुख मा. आमदार विरेंद्र भाऊ जगताप, प्रदेश उपाध्यक्ष भैय्याजी पवार, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कांचनमालाताई गावंडे आदी प्रमुख नेते या वेळी उपस्थित होते .
दर्यापूर विधानसभा येथील तात्यासाहेब खंडारे, इटकी ग्रा.उप-सरपंच राजूभाऊ वाळसे, युवक काँग्रेस दर्यापूर विधानसभा उपाध्यक्ष अडुळा बाजार ग्रा.सरपंच अंकुश खंडारे, लेगाव ग्रा. प्रवीण डोंगरदिवे, राजेगाव सदस्य ग्रा.मंगेश कलाने, सतेगाव संजय हिवराळे, ज्येष्ठ नेते सिताराम खंडारे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिंदे, रामचंद्र खडसे, ईश्वर खंडारे, शंकरराव खंडारे, सुरेश वाळसे, आकाश खडसे, गोपाल गवई, साहेब राव पाटोळे, रामेश्वर सरकटे, बबली बंडू झाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते कलाने यांच्या समर्थनाथ उपस्थित होते.
Discussion about this post