लांजा तालुक्यातील गोविल बौद्ध वाडी-1 येथे 12 मार्च 2025 रोजी पहाटे बिबट्याने गाईवर हल्ला करून तिला ठार मारले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने सरपंच व पोलीस पाटलांना कळवले. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. होळी व शिमगा महोत्सव तोंडावर आल्याने मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडून बौद्ध वाडीमध्ये पिंजऱ्याची तातडीने सोय करण्याची मागणी केली आहे. तसेच लांजा तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, अशीही मागणी केली जात आहे.
📍 प्रतिनिधी: विजय पवार, लांजा
Discussion about this post