प्रतिनिधी: भरत पुंजारा

तवा, डहाणू तालुक्यातील तवा येथे ११ दिवसीय गणरायाची काल भव्य दिव्य अशी विसर्जन मिरवणूक तवा साई बाबा मंदिर येथुन काढण्यात आली होती. या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने तवा,ब-हाणपुर, कोल्हाण, धामटणे, पेठ, वांगर्जे ह्या गावातून गणेश भक्त सामील झाले होते.
गावातील सर्व लहान मोठी मंडळी ही मिरवणूक पाहण्यासाठी जमली होती, काही जण आपल्या मोबाईलमध्ये मिरवणुकी चे क्षणचित्रे टिपत होते.हि मिरवणूक जवळपास पाच तासात विसर्जन स्थळी पोचल्यावर गणरायाची पुजा, आरती करून, “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या”,”गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला” अशा घोषणा देत अखेरचा निरोप दिला.
गणरायचे विसर्जन मिरवणूक यशस्वीतेसाठी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष कुणाल पासारे उपाध्यक्ष प्रतिक धांगडा समाजसेवक मुकुंद नम, जितेश तुंबडा, प्रल्हाद नम, सुनिल वनगा, महादेव नम, चिंतामण नम, प्रदिप नम, मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वीपणे पार पाडली.
Discussion about this post