.खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
तालुका प्रतिनिधी राजकुमार पांचाळ (9657978196)
राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हान यांचा बालेकील्ला असलेला 85-भोकर विधानसभा मतदार संघामध्ये नऊ गावांमधील दूरसंचार सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने टॉवर उभारण्यास मंजुरी दिली असून, यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना या टॉवरच्या उभारणीसाठी जमीन भाडे तत्त्वावर घेण्यास किंवा संपादन करण्यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. या गावांमध्ये भोकर तालुक्यातील | पाकी, पाकी तांडा, जामदरी, इळेगाव, सावरगाव माळ, भुरभुशी, देवठाणा तर मुदखेड तालुक्यातील दरेगाव आणि पिंपळकौठा मगरे या गावांचा समावेश आहे. संबंधित गावकऱ्यांनी आपल्या गावात दर्जेदार दूरसंचार सेवा मिळत नसल्याची तक्रार खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी या संदर्भात दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह बीएसएनएलच्या नवी दिल्ली व मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्याच प्रयत्नांना यश येत या नऊ गावांमधील दूरसंचार सेवा उन्नत करण्यासाठी केंद्र सरकारने ९ टॉवर उभारण्यास मंजुरी दिली आहे.

Discussion about this post